सोलापूर (प्रतिनिधी) १०.६.२४
वर्णमुद्रा प्रकाशित ‘सायलेंट आणि इतर कविता’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी ता. ८ जून रोजी कवी, कथाकार, नाटककार किरण येले यांच्या हस्ते पार पडला. या विषयी माहिती देताना सागर अचलकर यांनी सांगितले की, काही कारणास्तव राहून गेलेला प्रकाशन सोहळा फायनली निवडक मित्रमंडळी आणि काही ज्येष्ठांच्या उपस्थितीत पार पडला याचा आनंद आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी ममता बोल्ली, पुष्कराज गोरंटला आणि शोभा बोल्ली यांनी पुढाकार घेतला नसता तर हा प्रकाशन सोहळा पार पडला नसता.
ते पुढे म्हणाले, खरंतर याआधीच हा सोहळा होणार होता पण मीच उत्सुक नसल्यामुळे ते राहून गेलं. त्यामुळे काही मित्रमंडळी नाराज होती, अजूनही असतील. त्यांना हा सोहळा मोठ्या स्वरूपात आयोजित करायचा होता. पण मीच दाद देत नसल्यामुळे नंतर तेही नाराज झाले. पण परवा त्यांनाही वाटलं असेल छोटेखानी का असेना झाला एकदाचा प्रकाशन सोहळा.
या प्रकाशन सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून समीक्षक डॉ. दत्ता घोलप आणि कवितेवर भाष्य करण्यासाठी प्रा. नानासाहेब गव्हाणे उपस्थित होते. सुत्रसंचालन लक्ष्मीकांत वेदपाठक, प्रस्तावना ममता बोल्ली तर आभार प्रदर्शन अमृत ढगे यांनी केले.
कार्यक्रमास शिल्पकार भगवान रामपूरे आणि शिरीष देखणे खास उपस्थित होते.
कवितासंग्रह मागविण्यासाठी शेगाव येथील वर्णमुद्रा प्रकाशनचे मनोज पाठक यांना 99237 24550 नंबरवर संपर्क साधावा.