बुलडाणा | १४ जानेवारी | राजेंद्र देवढे
(education) सिंदखेडराजा येथील मातृतिर्थ राजमाता जिजाऊसृष्टी येथे ता.१२ जानेवारी रोजी भव्यदिव्य जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे पार पडला. लाखो रूपयांच्या पुस्तकांची विक्री या ठिकाणी होत असते. त्यानंतर सारथी संस्थेंतर्गत पुणे व छ. संभाजीनगर, नांदेड, अमरावती आणि परभणी या ४ विद्यापीठात PhD करणारे संशोधक विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने मातृतीर्थ सिंदखेडराजा राजमाता जिजाऊसृष्टी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
(education) सहभागी एक हजार विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केला. या उपक्रमात अहिल्यानगरचे संशोधक विद्यार्थी अमोल अर्जुन ताठे, नारायण यमाजी तुवर, खोमणे तनुजा संभाजी, प्रियंका जालिंदर चव्हाण, दीपाली राधाकृष्ण मोरे या संशोधकांचा समुह देखील सहभागी झाला होता.
अशा उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे भाग्य PhD संशोधक म्हणून आम्हाला देखील लाभले, असे मत संशोधक विद्यार्थी अमोल ताठे यांनी मांडले. या उपक्रमासाठी सारथी संस्थेचे विभागीय संचालक अशोक काकडे व प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.श्रीकांत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
हे ही पहा : छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांचे श्रध्दास्थान शाह शरीफ दर्गा