Shrigonda Accident: आढळगाव कोकणगाव फाट्यावर दुचाकींच्या धडकेत 2 ठार - Rayat Samachar
Ad image

Shrigonda Accident: आढळगाव कोकणगाव फाट्यावर दुचाकींच्या धडकेत 2 ठार

उपसंपादक | दिपक शिरसाठ

श्रीगोंदा | १२ जानेवारी | माधव बनसुडे

(Shrigonda Accident ) तालुक्यातील आढळगाव येथील कोकणगाव फाट्यावर जामखेडवरुन श्रीगोंद्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलचा कोकणगावकडून आढळगावकडे जाणाऱ्या दोन मोटारसायकलची आज ता.१२ रोजी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्हीही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यातील एक मयत बेलवंडी येथील असून त्यांची ओळख पटली तर दुसरा मयत बीड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समजली.

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

(Shrigonda Accident) दोन्ही दुचाकीस्वार अंदाजे ४० ते ४५ वयाचे असावेत. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार एक दुचाकीस्वार जामखेडकडून श्रीगोंद्याच्या दिशेने तर दुसरा कोकणगाव रोडने श्रीगोंद्याच्या दिशेने जाण्यासाठी जामखेडरोडला येत असताना एकमेकांना समोरची दुचाकी न दिसल्याने झालेला अपघात एवढा भयंकर होता की, या दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी जाऊन दोनही मृत्यूदेह श्रीगोंदा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

   या भयंकर अपघातानंतर दुचाकीस्वारांनी कमी वेगात आपली वाहने चालवावीत, विशेषत: शाळा कॉलेजच्या तरूणाईने, अशी चर्चा उपस्थित लोक करत होते.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
Leave a comment