अहमदनगर | २ ऑक्टोबर | अविनाश साठे
ahmednagar news अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरहद्दीत ‘स्वच्छताही सेवा’ या घोषणेखाली केंद्र सरकारच्या आदेशाने आयुक्त यशवंत डांगे यांनी पुढाकार घेत, वाजतगाजत सोशल मिडीया टिमसह स्वच्छता अभियान सुरू केले आहे. यामधे आजीमाजी नगरसेवक, आमदार खासदार प्रसिद्धीचे हात धुवून घेत असल्याचे सर्वत्र चित्र दिसत आहे. यामधे अनेक शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, महिला मंडळे उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन शहर स्वच्छतेची माहिम यशस्वी करत आहेत.
शहरस्वच्छतेची मोहिम चांगली सुरु असली तरी शहरातील लोकांची स्वच्छतेसह इतर सेवा देणारे कामगार, कर्मचारी रहात असलेल्या सिध्दार्थनगर लोकवस्तीची आवस्था अत्यंत दयनीय होती. महानरपालिकेचे आयुष्मान आरोग्यमंदिर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उभे असलेले दिसून येत होते. प्रवेशद्वाराजवळच अत्यंत मोठा उकिरडा आणि मोकाट जनावरे दिसत होती. अनेक दिवसांपासून जमा झालेला हा कचरा असावा हे पहाताक्षणी दिसत होते. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार आपल्या प्रतिनिधींनी या ठिकाणचे व्हिडीओचित्रण व छायाचित्र घेतले.
हि माहिती तात्काळ मनपा प्रशासनास समजली असता काही वेळेतच कचरा गोळा करणारा ट्रॅक्टर व कामगार आले आणि कचरा जमा करू लागले.
शहरातील नागरिकांना कुठे असा कचरा जमा झालेला दिसला तर तात्काळ मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग किंवा आयुक्त यशवंत डांगे यांच्या व्हॉटसअपवर गुगल लोकेशनसह फोटो पाठवावेत.
Please, post your reaction in the comment box after reading the news
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.