विद्यार्थी पालकांना ‘पर्यावरण संवर्धना’साठी सोबत जोडून घेण्याचे उद्दीष्ट
अहमदनगर | १५ डिसेंबर | दिपक शिरसाठ
Ahilyanagar News महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन ता. १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी शेवगाव येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधे आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पक्षीमित्रांमध्ये विचारविनिमय तसेच पुर्वतयारीसाठी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे बैठक संपन्न झाली.
Ahilyanagar News बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार तथा पक्षीमित्र बापूसाहेब भोसले होते. संमेलनाचे आयोजक न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगावचे प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे, जिल्ह्यातील बर्डिंग प्लस ग्रुपचे सदस्य आणि निसर्ग मित्र मंडळ ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
सुरूवातीला स्वागत करताना प्राचार्य डॉ. कुंदे यांनी आयोजक म्हणून सविस्तर भुमिका मांडली. तसेच महाविद्यालयात कायमस्वरूपी ‘आर्ट गॅलरी’ करण्यात येणार असून ती विद्यार्थी व निसर्गप्रेमींसाठी कायमस्वरूपी असणार असल्याचे सांगितले. बैठकीच्या चर्चेत बापूसाहेब भोसले, राजेंद्रप्रसाद स्वामी, विजय देवचके, ऋषिकेश लांडे, राहूल विळदकर, भैरवनाथ वाकळे, जयराम सातपुते, अमोल ताठे यांनी सहभाग घेतला.
बैठकीस स्वामी राजेंद्रप्रसाद लक्ष्मीकांत, विजय मनोहर देवचके, ऋषिकेश मंगलारम, विलास पाटील, डॉ.रविकांत पाचरणे, ऋषिकेश परदेशी, तुषार लहारे, प्रा.अमोल अर्जुन ताठे, प्रा.काळे आदिनाथ विठ्ठल, ऋषिकेश लांडे, भैरवनाथ वाकळे, सातपुते जयराम, शिवकुमार वाघुंबरे, राहुल विळदकर, संतोष विक्रम दहिफळे, बजरंग शंकरराव कुलकर्णी, मुंतोडे बाळासाहेब, नंदकुमार देशपांडे आणि प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.उषा शेरखाने यांची उपस्थिती होती.
चर्चेत पक्षीसंवर्धन, निसर्ग संरक्षण आणि आगामी संमेलनाच्या आयोजनाच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. उपस्थित पक्षीमित्रांनी आपले विचार आणि अनुभव मांडले तसेच पक्ष्यांचे संरक्षण कसे करावे यावर विचारविनिमय केला. माध्यमिक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे तसेच राहुल विळदकर यांच्या पुढाकाराने जिल्हास्तरावरील ‘परिसरातील पक्षी’ या विषयावर ‘रिल स्पर्धा’ आयोजित करण्याचे ठरले.
बापूसाहेब भोसले अध्यक्षीय भुमिका मांडताना म्हणाले, राज्यभरातील पक्षीमित्र आपल्या जिल्ह्यात येणार आहेत. त्यांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहिल असे संमेलन करायचे आहे तसेच त्यांनी डॉ.सालीम अली हे जायकवाडी पक्षी अभयारण्या येथे आले असता त्यावेळच्या अनेक आठवणी सांगितल्या. पुर्वी इतर ठिकाणी झालेली संमेलने यांची माहिती नविन सदस्यांना सांगितली. गुजरात जामनगर येथील जागतिक पक्षि संमेलनाच्या काही आठवणी व किस्से यावेळी सांगितले.
उपस्थितांचे आभार प्रा.सचिन पवार यांनी मानताना आगामी पक्षीमित्र संमेलनासाठी ही दुसरी बैठक मोलाची ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.


हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Contents
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.