ज्या टेम्पोमुळे प्रगती झाली त्यालाच आपल्या कुटुंबातील सदस्य मानले
नेवासा | ३ जानेवारी | विजय खंडागळे
(ahilyanagar news) तालुक्यातील बेल्हेकरवाडी येथील रवींद्र रामदास सोनवणे हा भिल्ल आदिवासी कष्टकरी तरुण. आईवडील व पत्नीसह काबाडकष्ट करून उपजिविका करतो. घरची परिस्थिती बेताचीच. गरीबी ही पाचवीलाच पुजलेली, त्यामुळे घरातील सर्वच मोलमजुरी करतात. पण रवींद्र हा लहानपणापासूनच वेगळ्या विचाराचा. त्याला वाहनाची आवड असल्याने तो जीसीबी चालवतच मोठा झाला. त्याने आई-वडिलांचे कष्ट व हालअपेष्ठा पाहिल्या. काही दिवसांनी एक जुना चार चाकी टेम्पो विकत घेतला. टेम्पोसाठी पैसे नव्हते म्हणून त्याने कर्ज काढले. वडिलांना टेम्पो घेऊन दिला. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चांगला चालला.
(ahilyanagar news) आता पाच वर्षे झाली, कर्ज फिटले. सर्व कुटुंब आनंदी झाले. ज्या टेम्पोमुळे प्रगती झाली त्यालाच आपल्या कुटुंबातील सदस्य मानले. त्या टेम्पोचा डिजे वाजत गाजत, केक कापून व परिसरातील आप्तेष्ट व नातेवाईकांना स्नेहभोजन देऊन मोठ्या उत्साहाने विधिवत पूजा पत्नी कल्पना सोनवणे, व मेहूणे भाऊसाहेब पवार यांच्या हस्ते करून वाढदिवस साजरा केला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने परिसरातील लोक उपस्थित होते. रविंद्रच्या कष्टाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Contents
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.