‘अल्पसंख्यांक’ समाजातील प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्याची आग्रही मागणी
अहमदनगर | १८ डिसेंबर | पंकज गुंदेचा
(Ahilyanagar News) १८ डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचाही अल्पसंख्यांक हक्क दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व अल्पसंख्याक समुहांची व्यापक बैठक जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी घेतली. यावेळी इंजि. यश प्रमोद शहा यांनी राज्य सरकारचे ‘जैन’ आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल अभिनंदन केले. जैन धर्मिय साधु साध्वी भगवंतांना विहार दरम्यान पोलीस सुरक्षा मिळत असल्याबद्दल धन्यवाद दिले तसेच अल्पसंख्यांक बांधवांना येणाऱ्या समस्यांची जाणीव प्रशासनाला करून दिली. एक खिडकी योजना जिल्ह्यात ‘चालू’ करण्याची आग्रही मागणी केली, जेणेकरून विविध योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होऊ शकेल. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात कायमस्वरूपी ऑफिस जागा नेमून द्यावी. जेणेकरून अल्पसंख्यांक समाज बांधवांना महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेणे व अडचणी सोडवण्यासाठी संपर्क करणे सुलभ होईल. कर्ज योजनांची माहिती वृत्तपत्रात तसेच सार्वजनिक ठिकाणी, धार्मिकस्थळांच्या ठिकाणी बॅनरद्वारे लावण्यात यावी. योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. बँक अधिकाऱ्यांची कर्ज प्रकरणा संदर्भात एकत्रित मीटिंग बोलवावी. शिक्षण विभागास माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांची एकत्रित मीटिंग घ्यावी. शाळा कॉलेजमध्ये दर्शनी भागात ‘अल्पसंख्यांक’ योजना संदर्भातील पत्रक माहिती लावण्यात यावे. तहसील कार्यालयातील उत्पन्न व इतर दाखले लवकरात लवकर मिळावेत. शहरातील अल्पसंख्यांक बांधवांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी द्याव्या अशी मागणी केली. अल्पसंख्यांक समाजातील विविध धार्मिकस्थळांना जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन व सामाजिक प्रतिनिधी यांनी एकत्रित सर्व ठिकाणी भेटी द्याव्यात जेणेकरून सामाजिक सलोखा जिल्ह्यात चांगल्या प्रकारे जपला जाईल.
पंतप्रधान १५ सूत्री योजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तिमाही मीटिंग घेण्यात यावी. अशा विविध समाजातील अडचणी यश यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
(Ahilyanagar News) जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले, शहा व इतर प्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांची नोंद प्रशासनाच्या वतीने मी स्वतः तसेच सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देखील शिक्षण विभाग, मौलाना आर्थिक विकास महामंडळ, पोलीस प्रशासन व इतर संबंधितांना तात्काळ दिल्या. तिमाही मीटिंग देखील घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, तहसीलदार घोरपडे, शिक्षण विभागाचे दरेकर, शेख, मौलाना आझादच्या गोरे व पटेल, जिल्हा नियोजन अधिकारी दिपक दातीर, महापालिका उपायुक्त प्रियांका शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, अल्पसंख्यांक प्रतिनिधी इंजि. यश शहा, पायल शहा, सय्यद वहाब, फिरोज शेख, हरजीतसिंह वधवा, सैय्यद अफजल आदी उपस्थित होते.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Contents
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.