पिंपळगाव माळवी | १४ जून | प्रतिनिधी
(Agriculture) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर तालुक्यातील मौजे पोखर्डी येथील कराळे वस्तीवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात “ऑरगॅनिक नगर सेंद्रिय शेती गटास” मुग बियाण्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पीक प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत राबवण्यात आला.
कार्यक्रमात सुधाकर बोराळे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर), दत्तात्रय डमाळे (उपविभागीय कृषी अधिकारी), विकास पाटील (तालुका कृषी अधिकारी), माधवी घोरपडे (मंडळ कृषी अधिकारी, जेऊर) यांचे मार्गदर्शन लाभले.
शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन
(Agriculture) उप कृषी अधिकारी सतीश गोसावी यांनी खरीप हंगाम, बीज प्रक्रिया, हुमणी आळी नियंत्रण, योग्य शेती साहित्याचा वापर, माती नमुना तपासणी व शेती यांत्रिकीकरणाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करून रुंद वरंबा सरी यंत्राच्या माध्यमातून पेरणी करण्याचे आवाहन केले, जेणेकरून उत्पादन वाढीस लागेल व खर्चात बचत होईल.
उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक निर्धार
(Agriculture) या कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी राजेंद्र कर्डिले आणि शेतकरी मित्र सुनील कराळे यांनी केले होते. पोखर्डीचे सरपंच अंतूशेठ वारुळे यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अंगीकार करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि शाश्वत शेतीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले.
हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
