अहमदनगर | २८ डिसेंबर | प्रतिनिधी
Ahilyanagar News10 देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक दूरदर्शी निर्णय घेतले. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी केला. त्यांनी कर्जमाफी करून शेतकऱ्यांना संजीवनी दिली, त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमानावर सकारात्मक परिणाम झाले, असे मत शेतकरी संघटनेचे नेते संदीप गेरंगे ह्यांनी व्यक्त केले.
देशाचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता आणि आदरांजली वाहण्यासाठी आत्मनिर्धार फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते.
उपस्थितांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी निंबळकचे उपसरपंच बाळासाहेब कोतकर, पोपटराव गाडगे, फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी, ज्योतिषअभ्यासक संतोष घोलप, बाळासाहेब थोरे, राहुल ठाणगे, नामदेव लोंढे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
राष्ट्रगीत गायनाने सभेची सांगता झाली.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी