Ahilyanagar News: एकनाथ माध्यमिक विद्यालयात गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

60 / 100 SEO Score

शेवगाव |२०डिसेंबर|शिवाजी घुगे

Ahilyanagar News तालुक्यातील  एरंडगाव येथील एकनाथ माध्यमिक विद्यालयात गणित – विज्ञान प्रदर्शनाचे त्याचबरोबर आनंद नगरीचे भव्य-दिव्य असे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, प्रत्येक वैज्ञानिक गोष्टीमागील कार्यकारण भाग विद्यार्थ्यांना समजावा, गणित विषय विद्यार्थ्यांनी आवडीने शिकावा म्हणून तसेच, विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहारिक ज्ञान लक्षात यावे, त्यांना प्रत्यक्षात विक्रेता व ग्राहकांची भूमिका निभावता यावी यासाठी मुख्याध्यापक श्री बाळासाहेब घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात गणित – विज्ञान प्रदर्शनाचे व आनंद बाजाराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शाळास्तरीय प्रदर्शनात लहान आणि मोठ्या गटात 35 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रतिकृती सादर केल्या ज्यात साखर कारखाना, ज्वालामुखी, विजनिर्मिती, डी जे, सेंद्रिय शेती, मानवी अवयव, वेगवेगळ्या व्याधीची माहिती, पर्यावरण रक्षण, प्रदूषण निवारण, गणित पाढे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवणे, कोन व त्यांची मापे अशा विविध विषयावर विद्यार्थांनी विज्ञान गणित शिक्षणाच्या मार्गदर्शनाखाली उपकरणे बनवली होती.

आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतातील भाजीपाला, स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. यास विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचेकडे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.या प्रदर्शनास परिसरातील विविध शाळेनी, अनेक पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या विविध वस्तूंची खरेदी करून आनंद घेतला.

या प्रदर्शनाचे उदघाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब घोरपडे यांनी केले. प्रदर्शन व आनंदनगरी यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील रणसिंग दिलीप , दहिफळे प्रकाश , नजन कैलास, कदम नवनाथ, पवार किशोर, देवेंद्र बोडखे, अर्जुन घुगे, विद्या भागवत, फड आशा, किशोर गोर्डे, सुबोध बरकले, पाटेकर काकासाहेब, समद शेख, संजय मगर, काळे धोंडीराम, गुजर दत्तात्रय आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे संस्थेच्या अध्यक्षा मोरे मॅडम, सचिव पवार सर, एरंडगाव समसूदचे सरपंच संतोषराव धस, भागवत एरंडगाव  चे सरपंच गोकुळ भागवत, लाखेफळचे सरपंच सुरेश गजभिव आदींनी कौतुक केले.

 

हे हि वाचा :  द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *