Amc: सभासदांच्या निरोगी आरोग्यासाठी पतसंस्था कटिबद्ध - बाळासाहेब पवार; पतसंस्थेच्या वतीने उपचारासाठी दिला आर्थिक मदतीचा धनादेश - Rayat Samachar

Amc: सभासदांच्या निरोगी आरोग्यासाठी पतसंस्था कटिबद्ध – बाळासाहेब पवार; पतसंस्थेच्या वतीने उपचारासाठी दिला आर्थिक मदतीचा धनादेश

रयत समाचार वृत्तसेवा
72 / 100

मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात असतात

अहमदनगर | २९ नोव्हेंबर | लहू दळवी

   आपल्या Amc महानगरपालिकेला सुमारे १०० वर्षाची उज्वल परंपरा असून सभासदांच्या जोरावर संस्थेने यशस्वी भरारी घेतली. त्यामुळे सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात असून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत सभासदांच्या आरोग्याची तात्काळ तपासणी होऊन उपचार घेण्यासाठी तातडीने आर्थिक मदतीचा धनादेश दिला जातो, महापालिका कर्मचारी नेहमीच दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असतात त्यामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे देखील आजारपण आपल्या अंगावर काढले जाते. त्यामुळे एखाद्या सभासदाला मोठ्या आजाराला सामोरे जावे लागते. आजारपणाचे तात्काळ निदान होऊन त्यावर उपचार घेण्यासाठी पतसंस्था आपले कर्तव्य बजावत असून सभासदाच्या निरोगी आरोग्यासाठी महापालिका पतसंस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चेअरमन बाळासाहेब पवार यांनी केले.

      Amc महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासद गोरक्षनाथ बहिरनाथ भोसले यांच्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त करताना चेअरमन बाळासाहेब पवार, व्हा. चेअरमन सोमनाथ सोनावणे समवेत ज्येष्ठ संचालक जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सतीश ताठे, बाळासाहेब गंगेकर, किशोर कानडे, श्रीधर देशपांडे, अजय कांबळे, गुलाब गाडे, कैलास चावरे, बलराज गायकवाड, विकास गीते, विजय कोतकर, संचालिका प्रमिला पवार, उषा वैराळ, कार्यलक्ष्मी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.

 मुलामुलींच्या शिक्षणासाठी, लग्न समारंभासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सभासदांच्या आरोग्याच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश दिला जातो. पतसंस्था नियमित सभासदाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असल्याचे मत ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल यांनी व्यक्त केले.

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

Share This Article
Leave a comment