Social Justice: २६ नोव्हेंबरला 'संविधान जागर महोत्सव'चे आयोजन; संविधान दिन होणार व्यापक स्वरूपात साजरा; भव्य रॅलीसह 'संविधान सर्वांसाठी' व्याख्यानाचे आयोजन - Rayat Samachar

Social Justice: २६ नोव्हेंबरला ‘संविधान जागर महोत्सव’चे आयोजन; संविधान दिन होणार व्यापक स्वरूपात साजरा; भव्य रॅलीसह ‘संविधान सर्वांसाठी’ व्याख्यानाचे आयोजन

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
70 / 100

अहमदनगर | २४ नोव्हेंबर | प्रतिनिधी

Social Justice मानवाधिकार अभियान व सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, सहायक आयुक्त कार्यालय समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्ह्यातील समविचारी संस्था, संघटना, महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून अहमदनगर शहरामध्ये मंगळवारी ता.२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त ‘संविधान जागर महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले.

अधिक माहिती देतांना मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.संतोष गायकवाड यांनी सांगितले, मानवाधिकार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या महोत्सवाचे यंदाचे ७ वे वर्ष आहे. याहि वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्सवाच्या स्वरुपात साजरा करण्याचा मानवाधिकार अभियान तसेच अहमदनगर येथील सर्व पुरोगामी संस्था संघटना यांचा मानस आहे.

या महोत्सवाअंतर्गत संविधान रॅलीच्या सोबतच ता.२६ नोव्हेंबर संविधान दिन ते १० डिसेंबर मानवाधिकार दिन या दरम्यान ‘संविधान जागर पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. संविधानाचा अधिकाधिक प्रचार व्हावा म्हणून संविधान जागर रथ, पथनाट्य, संविधान गीते, प्रबोधनपर व्याख्याने, चर्चासत्रे, शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी या स्वरुपात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त कार्यालय समाजकल्याण विभागाचे प्रवीण कोरगंटीवार यांनी दिली.

संविधान जागर महोत्सवाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक सब्बन म्हणाले, मंगळवारी ता.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ११ दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शहरातून भव्य संविधान जागर रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – महात्मा फुले पुतळा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा – सीएसआरडी महाविद्यालय असा असणार असून सीएसआरडी महाविद्यालय येथे संविधान सभेने रॅलीचा समारोप होणार.

सीएसआरडी सभागृहात होत असलेल्या व्याख्यानासाठी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रकाश पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संविधान अभ्यासक व प्रचारक सुभाष वारे असणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे हे उपस्थित असणार आहे.

संविधान जागर रॅलीस जास्तीत जास्त संस्था, संघटना, महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा व भारतीय संविधान संवर्धनासाठी आपले बहुमोल योगदान द्यावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष सब्बन यांनी केले.

संविधान जागर महोत्सवाअंतर्गत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ॲड.संतोष गायकवाड – ९०२८५१००२४, संध्याताई मेढे – ७७०९९८५५५५, सॅम्यूएल वाघमारे – ८७८८४१२७८० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

Share This Article
Leave a comment