Politics: निळवंडे कालव्यांना आडवे येणाऱ्यांना आडवे करा - नानासाहेब गाढवे; कालवा समिती निवडणुकीत घेणार निर्णायक भूमिका ? - Rayat Samachar
job alert

Politics: निळवंडे कालव्यांना आडवे येणाऱ्यांना आडवे करा – नानासाहेब गाढवे; कालवा समिती निवडणुकीत घेणार निर्णायक भूमिका ?

67 / 100

कोपरगाव | २० नोव्हेंबर | किसन पवार

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

Politics उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील नेते जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन फसवत आहेत, मात्र निळवंडेच्या कालव्यांच्या अर्धवट कामाबाबत काहीही बोलत नाही. याबाबत निळवंडे कालवा कृती समितीने आपली भूमिका जाहीर केली असून, ज्या नेत्यांनी निळवंडे प्रकल्पाला आपल्या दारू कारखान्यांसाठी ५४ वर्षे अडथळे आणले आणि निवडणुकीत सत्तेच्या पोळ्या भाजल्या तीच मंडळी आज कालव्याचे खोटे श्रेय घेत असून त्यांना या विधानसभा निवडणुकीच्या मतपेटीतून जागा दाखवा, असे आवाहन निळवंडे कालवा कृती समितीचे संघटक नानासाहेब गाढवे यांनी केले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

राज्यात बुधवारी ता.२० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी राज्यात सर्वत्र धामधूम सुरू आहे. सर्वच कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मात्र निळवंडे प्रश्नांच्या अर्धवट कामाच्या बाबतीत कुणीही चकार शब्दही काढला नाही. एरव्ही श्रेयासाठी पुढे येणारी ही नेतेमंडळी आता या प्रश्नावर तोंडावर बोट धरून बसली. याबाबत गावोगावच्या कार्यकर्त्यांनी आणि दुष्काळी जनतेने निळवंडे कालवा कृती समितीच्या नेतृत्वाखाली लढा लढला असून या उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी येत्या १४ जुलै रोजी ५४ वर्ष उलटले असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून ०५ हजार १७७ कोटींवर गेला. Politics

डावा कालवा मार्च २०२३ अखेर तर उजवा कालवा हा जून २०२३ अखेर पूर्ण करणे ठरले होते. हा प्रकल्प पूर्ण व्हावा, ही राजकीय नेत्यांची मानसिकता नाही. त्यांनी यासाठी विविध क्लुप्त्या लढविण्याचे काम राहाता आणि संगमनेर, कोपरगाव, अकोले तालुक्यातील नेतेमंडळी करत आहे. प्रकल्प अर्धवट ठेवण्यासाठी उद्योग अद्याप सुरूच ठेवले आहे. अद्याप वितरण व्यवस्था, अस्तरीकरण अपूर्ण आहे.

खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मार्फत केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांचे सहाय्याने नाबार्डकडून ८०० कोटी रुपयांची तरतूद केली. अद्याप गतवर्षी चाचणीचे पाणी अनेक दुष्काळी गावांना मिळालेले नाही. त्यासाठी अकोले तालुक्यातील अस्तरीकरण जलद होणे गरजेचे असताना या पातळीवर मंदगती दिसत आहे. याशिवाय अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्याच्या साईड गटारी अद्याप पूर्ण झालेल्या नाही. परिणामी प्रत्येक आवर्तनात काही राजकीय संघटना आंदोलने करून आवर्तनाचे पाणी बंद करण्याची मागणी करतात. शेतीचे नुकसान होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांची नुकसान भरपाई दिलेली नाही, मात्र अकोले तालुक्यातील कि.मी. ०१ ते २८ दरम्यान कालव्यांच्या दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या जलसंपदा विभागाने पूर्ण केलेल्या नाही. त्याबाबत संघटनेने या प्रश्नी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे दुष्काळी भागातील १८२ गावांवर अन्याय होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर निळवंडे कालवा कृती समितीची प्रमुख कार्यकर्त्यांची मागील सप्ताहात शिर्डी येथे बैठक आयोजित केली होती. त्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे काम केले त्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज असून दुष्काळी शेतकरी आणि समितीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आपली भूमिका निभवावी, असे आवाहन नानासाहेब गाढवे यांनी शेवटी केले.

या निवडणुकीत कोपरगावचे उमेदवार संदीप वर्पे यांनी शरद पवार यांच्या मंचावर तर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी डॉ.आंबेडकर मैदानावर निळवंडे कालवा कृती समितीने कालव्यासांठी केलेल्या रस्त्यावरील व उच्च न्यायिक लढ्याचे श्रेय समितीस दिले. त्यांचे शेतकऱ्यांनी अभिनंदन केले.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
सत्य की जय हो
Leave a review