कोपरगाव | ९ ऑक्टोबर | किसन पवार
Women येथील मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचतगटांना २ कोटी ५१ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले. येसगाव, चांदेकसारे, चासनळी, दहेगाव बोलका येथे कार्यक्रम पार पडला.
यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, महिला बचतगटांची सुरुवात अत्यंत कठीण परिस्थितीत झाली. त्याकाळी महिलांना आर्थिक अधिकार मिळण्यासाठी सामाजिक विचारसरणी बदलून काम करण्याची गरज ओळखून मी या कामाला सुरुवात केली. सध्या जवळपास तीन हजार बचतगटांचे जाळे आपण उभारले. तीस हजारहून अधिक महिला आज आर्थिक सक्षम होण्यासाठी मदत मिळाली. माझ्या वाढदिवसाला ज्यांच्यासाठी मी नेहमी काम करत आले त्यांच्यात मला उपस्थित राहता येऊन शुभेच्छा मिळाल्या हे आनंदाचे क्षण आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, माझे काम हे महिलांचे आयुष्य उज्वल करण्यासाठी होते व यापुढेही असेल. महिला ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जात असते. समाजाने महिलांना समजून घेऊन त्यांना योग्य सन्मान देण्याची गरज आहे. विविध महिला अत्याचाराच्या घटना घडतात त्यावेळी मन व्यथीत होते. कुटुंब आणि समाज या चौकटीत आयुष्य जगताना एक स्त्री तारेवरची कसरत करते त्यामागे पुरुषवर्गाने देखील साथ दिली तर महिला काय क्रांती करू शकतात हे अनेक उदाहरण आपण पाहिले आहे. जिथे महिलांची हाक येईल तिथे मी सोबत असेल असे, कोल्हे म्हणाल्या.
यावेळी विविध कर्ज मंजुरी झालेल्या बचत गटाच्या महिला तसेच संजीवनी उद्योग समूहाचे आजी-माजी पदाधिकारी संचालक कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.