Culture: आदी विनायक : सोंड नसलेला जगातील एकमेव गणपती

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

धर्मवार्ता | ७ सप्टेंबर | ॲड. निरज धुमाळ

Culture जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख – हत्तीमुखी असलेले आपल्याला पाहण्यास मिळते. अर्थात प्रस्थापित सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या या संघर्षात गणपतीच्या अन्यरुपाची कोणी कल्पनाही करू शकत नाही, एवढा सांस्कृतिक गुलामी आणि सांस्कृतिक अंधकाराने समाजाचा मेंदू गुलाम करून ठेवला.

मात्र दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. हे प्राचीन शिल्प आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाण्यास पुरेसे आहे. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासून जवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे. ‘आदी विनायक’ असे या गणपतीचे व मंदिराचे नाव आहे. गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती असे संबोधले जाते.

|| जन गण मन अधिनायक जय हे ||

गण अधिनायक असलेल्या अशा गणव्यवस्थेच्या शिल्पकार असलेल्या गणपती (लोकप्रमुख) सोहळ्याच्या मनःपूर्व सदिच्छा

कृपया, लेख वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा :

https://rayatsamachar.com/archives/7428


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading