मुंबई | २ ऑगस्ट | गुरुदत्त वाकदेकर
प्रज्ञावर्धिनी फाऊंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांनी शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी बोरिवली पश्चिम येथील सुविद्या Sports अकादमीमधे किड्स स्पोर्ट्स कार्निव्हलचे आयोजन केले होते.
यावेळी प्रज्ञावर्धिनी फाऊंडेशनच्या विश्वस्त ॲड.रूपाली ठाकूर, विश्वस्त वैशाली भिडे-बर्वे, विश्वस्त महादेव गोविंद रानडे, सुविद्या प्रसारक संघाचे माजी अध्यक्ष डॉ.वसंत खटाव, अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्सचे विल्फ्रेड मेनेझेस, एमसीए क्रिकेट प्रशिक्षक नागेश ठाकूर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे माजी सरचिटणीस नरेंद्र बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पोर्ट्स कार्निव्हल जबरदस्त यशस्वी ठरला, ज्यामुळे विद्यार्थांना खेळ आणि त्याची मूल्ये आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली.
उत्तर मुंबई मतदारसंघाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि वीरमाता अनुराधाताई गोरे यांनी यावेळी १५ शाळांमधील ८५० पालक आणि विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी शिस्त आणि संयम विकसित करण्यासाठी खेळाचे महत्त्व पटवून दिले. गोपाळ शेट्टी यांनी ‘खेळ आपल्याला शिस्तबद्धता आणि योग्य संयम शिकवतात’ याबद्दल मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मुंबई उपनगराला नजीकच्या भविष्यात स्पोर्ट्स हब बनवण्याचा आपला संकल्प जाहीर केला.
Contents
मुंबई | २ ऑगस्ट | गुरुदत्त वाकदेकरप्रज्ञावर्धिनी फाऊंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांनी शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी बोरिवली पश्चिम येथील सुविद्या Sports अकादमीमधे किड्स स्पोर्ट्स कार्निव्हलचे आयोजन केले होते.यावेळी प्रज्ञावर्धिनी फाऊंडेशनच्या विश्वस्त ॲड.रूपाली ठाकूर, विश्वस्त वैशाली भिडे-बर्वे, विश्वस्त महादेव गोविंद रानडे, सुविद्या प्रसारक संघाचे माजी अध्यक्ष डॉ.वसंत खटाव, अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्सचे विल्फ्रेड मेनेझेस, एमसीए क्रिकेट प्रशिक्षक नागेश ठाकूर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे माजी सरचिटणीस नरेंद्र बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा