शेवगाव | २७ ऑगस्ट | प्रतिनिधी
शहरामध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून होत असलेल्या public issue पावसामुळे नाल्या तुंबल्यामुळ शहराला तलावाचे स्वरूप आले. मोठा पाऊस झाल्यानंतर शहरांमध्ये सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी पहावयास मिळते. त्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध पुरुष, महिला, दिव्यांग तसेच रहदारीला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर पावसाने साचलेल्या पाण्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. पावसाचे पाणी दुकानात तसेच गोडावूनमध्ये घुसल्यामुळे माल खराब झाला. आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले.
याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड संजय नांगरे यांनी शनिवारी दुपारी झालेल्या पावसामध्ये रस्त्यावर असलेल्या मोठ्या पाण्यात पोहून शेवगाव नगरपरिषद प्रशासनाचा निषेध केला. यावेळी त्यांनी भर पावसात शेवगाव नगर परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करून सामान्य नागरिक तसेच नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा घेऊन त्यांनी यावेळी मोठ्या घोषणा दिल्या. त्यांच्याबरोबर निलेश लंके प्रतिष्ठानचे राहुल वरे हे ही या आंदोलनात सहभागी झाले होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा