अहमदनगर | २६ ऑगस्ट | रयत समाचार विशेष प्रतिनिधी
नागापूर येथील काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग इन्स्टिट्यूटला बी.एस्सी. नर्सिंग कोर्सला मान्यता मिळाली आहे. सन २०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी ही Education सुवर्णसंधी आहे. महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असल्याची माहिती फौंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी दिली.
डॉ.म्हस्के पुढे म्हणाले की, बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी साठ जागांवर प्रवेश देण्यास शासनाने मान्यता दिली. त्यानुसार ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयातील संपूर्ण स्टाफ हा उच्चशिक्षित असून, महाविद्यालयासाठी अद्ययावत सुविधा आणि इमारत संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. बारावी सायन्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना किमान ४५% गुण असणे आवश्यक तसेच आरक्षित प्रवर्गासाठी ४०% गुण आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या शिक्षणासाठी ही मोठी संधी असून, प्रवेशासाठी महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन विश्वस्त डॉ.सुमति म्हस्के, विश्वस्त डॉ.अभितेज म्हस्के, विश्वस्त डॉ.दिप्ती ठाकरे, सीईओ आर्किटेक्ट समीर ठाकरे, प्राचार्य अजित चवरदार यांनी केले.
फाॅरेनमध्ये काम करण्याची संधी !
डॉ.सुभाष म्हस्के म्हणाले की, सर्वसामान्य, शेतकरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्याचे माजी आमदार काकासाहेब म्हस्के यांचे स्वप्न होते. त्यांच्या विचारांचा वारसा जपत फौंडेशनचे कार्य आज तिसऱ्या पिढीतही सुरु आहे. आता बी.एस्सी नर्सिंग काॅलेजला मान्यता मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भारतासह इंग्लंड, अमेरिकासारख्या फाॅरेन देशात काम करण्याची दारे खुली होणार असल्याचे ते म्हणाले. तसेच पार्वतीबाई म्हस्के ए.एन.एम आणि जी.एन.एम.काॅलेजचे हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी शासकीय, निमशासकीय व खासगी वैद्यकीय संस्थांमध्ये आरोग्यसेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा