Business | नफा दुय्यम, प्रवाशांचा आनंद व सुरक्षितता प्रथम – स्वराज टूर्स ॲण्ड ट्रव्हलर्स यांची भुमिका

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
Subeditor | Dipak Shirasath

समाजसंवाद | ३०.१ | राहुल नवले

(Business) जय जिजाऊ…
प्रत्येक घटना ही काहीतरी बोध देणारी असते. मात्र तो बोध माणूस किती काळ आणि किती गांभीर्याने लक्षात ठेवतो, हे सांगता येत नाही. काल घडलेल्या अजितदादा यांच्या विमान अपघातानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी विमान प्रवास केलेला आहे, काहींनी नाही; तरीही प्रत्येकजण पायलट, विमानाची मेंटेनन्स व्यवस्था, विमानाचे वजन यावर चर्चा करत आहे. कदाचित सर्व काही नियमांनुसारच झाले असेल, पण अपघात हा अपघातच असतो. जे समोर घडते, ते स्वीकारावेच लागते. त्या अपघाताचे दुःख आज संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतो आहे, हे वास्तव आहे.Business

(Business) या घटनेतून आपण काय बोध घ्यायचा, हा खरा प्रश्न आहे. मी अनेक वर्षांपासून ट्रॅव्हल्स व्यवसायात कार्यरत आहे. माझ्या प्रत्येक गाडीवर मी निर्व्यसनी चालक नेमतो. गाडीची वेळोवेळी योग्य देखभाल (मेंटेनन्स) करतो आणि सर्व कागदपत्रे (पेपर) नेहमी अद्ययावत ठेवतो. यासाठी लाखो रुपये खर्च होतात. मात्र व्यवसाय दीर्घकाळ टिकवायचा असेल, विश्वासार्ह बनवायचा असेल, तर हाच योग्य मार्ग आहे.Business

(Business) मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे आजपर्यंत मला एकही असा सुज्ञ ग्राहक भेटला नाही की, जो गाडीचे भाडे ठरवण्याआधी “गाडीचे सर्व कागदपत्रे क्लिअर आहेत का?” किंवा “मेंटेनन्स वेळेवर झाले आहे का?” असा प्रश्न विचारतो. हे खरोखरच चिंताजनक आहे. प्रवासी भाडे ठरवताना एका रुपयाचा विचार करतो, पण ज्या गाडीतून तो स्वतः, त्याचे कुटुंबीय व नातेवाईक प्रवास करणार असतात, त्या गाडीची सुरक्षितता तपासण्याचा विचार मात्र करत नाही. त्याला एकच गोष्ट महत्त्वाची वाटते, गाडी कमीत कमी दरात कशी मिळेल.
असो, तो त्यांचा दृष्टिकोन आहे. मात्र एक जबाबदार आणि जागरूक ट्रॅव्हल्स व्यावसायिक म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि विश्वासार्ह असणे ही माझी जबाबदारी आहे. म्हणूनच माझ्या सर्व गाड्यांवर चालक निर्व्यसनी असतात. नफ्यात कितीही तडजोड करावी लागली तरी गाडीचे सर्व कागदपत्रे मुदत संपण्याआधी पूर्ण करणे आणि वेळेवर मेंटेनन्स करणे, या गोष्टींशी कोणतीही तडजोड केली जात नाही.
जर प्रत्येक खासगी आणि व्यावसायिक वाहनमालकाने या नियमांचे काटेकोर पालन केले, तर ते केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर प्रवाशांसाठीही निश्चितच हितकारक ठरेल, असे मला मनापासून वाटते.

Business (लेखक कर्जत येथील ‘स्वराज टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स’चे संचालक. संपर्क : 9922027373)

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading