Education | प्रा.डॉ. विजय कदम यांना ‘मेस्टा’चा आदर्श शिक्षक पुरस्कार; शैक्षणिक निष्ठेचा झाला गौरव

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
Subeditor | Dipak Shirasath

कोपरगाव | ३१.१ | रयत समाचार

(Education) महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल्स ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) संघटनेचे अकरावे राज्यस्तरीय अधिवेशन कोपरगावमधील कोकमठाण येथील आत्मामलिक ध्यानपीठ येथे उत्साहात पार पडले. अधिवेशनात आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात अहमदनगर महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख तसेच तक्षशिला इंग्लिश मीडियम व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक प्रा.डॉ. विजय कदम यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

(Education) मेस्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय तायडे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकमठाण येथील आत्मामलिक ध्यानपीठ येथे पार पडलेल्या या सोहळ्यास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार किशोर दराडे, शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

(Education) प्रा. डॉ. विजय कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली सातत्यपूर्ण मेहनत तसेच तक्षशिला इंग्लिश मीडियम व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून दिलेले मोलाचे योगदान लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या शैक्षणिक निष्ठा, समर्पण आणि सेवाभावाचा सन्मान असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या गौरवामुळे प्रा. डॉ. विजय कदम यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्यामुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading