अहमदनगर | २५ ऑगस्ट | प्रतिनिधी
राज्यातील education शिक्षणक्षेत्रात विनाअनुदान तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षणसंस्थांची संख्या मोठी आहे. येथे काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि शासन अनुदानित संस्थांतील कर्मचारी यांचे काम सारखेच आहे, मात्र वेतनात प्रचंड तफावत आहे. विनाअनुदानित संस्थांतील कर्मचाऱ्यांना अतिशय कमी पगारात काम करावे लागते. या महत्वाच्या समस्येसह कर्मचाऱ्यांना आणखीही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने विनाअनुदानित शिक्षणव्यवस्था न्याय व हक्क परिषदेच्यावतीने भव्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत चर्चासत्र होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड व लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ. एस. पी. लवांडे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब क्षेत्रे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, डॉ. प्रमोद तांबे आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे आयोजक सुदाम लगड यांनी केले आहे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.