मुंबई | २४ ऑगस्ट | प्रतिनिधी
येथील उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय, ग्रंथालय संचालनालय यांच्या वतीने डाॅ.शि.रा.रंगनाथन ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) Award विभागस्तरीय सन १०२२-२३ वर्षाचा पुरस्कार अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल संभाजी इथापे यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ता.२० ऑगस्ट रोजी एस.एन.डी.टी., महिला महाविद्यालय येथे संपन्न झाला.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, राज्यसभेचे माजी खासदार, लेखक, पत्रकार कुमार केतकर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ.गजानन कोटेवार, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर सहा ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे (नाशिक), सहा ग्रंथालय संचालक सुनील हुसे (औरंगाबाद) अनिल बाविस्कर, संजय डाडर (मुंबई), जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे निरीक्षक रामदास शिंदे ग्रंथालय संचालनालयातील सर्व अधिकारी, सर्व जिल्ह्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सर्व विभागाचे पदाधिकारी, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते, मोठ्या संख्येत उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते अमोल इथापे आणि सविता इथापे यांनी हा बहुमान स्वीकारला. बहुमानाबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, अनंत देसाई, खजिनदार तन्वीर खान, संचालक वैद्य राजा ठाकूर, राहूल तांबोळी,अनिल लोखंडे, प्रा.मेधा काळे, किरण आगरवाल, अजित रेखी, शिल्पा रसाळ, प्रो.ज्योती कुलकर्णी, संजय पाटणकर, डॉ. शैलेद्र पाटणकर, चंद्रकांत पालवे, गौरी जोशी, यांनी अभिनंदन केले.
यावेळी अक्षदा, प्रगती इथापे, सहा. ग्रंथपाल नितील भारताल, संजय गाडेकर, संकेत फाटक, पल्लवी कुक्कडवाल, वर्षा जोशी, निखिल ढाकणे आदी उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा