public issue: उंच क्रेन लावून दादा-भाऊंचे अनाधिकृत फ्लेक्स ‘अर्धे’च काढले; झालेल्या खर्चाची मनपाने वसूली करावी; रयत समाचार बातमीचा इम्पॅक्ट

69 / 100 SEO Score

अहमदनगर | १७ ऑगस्ट | भैरवनाथ वाकळे

public issue: ‘प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आर्थिक नुकसानीसह शहराचे विद्रूपीकरण; मनपा आयुक्त डांगे यांनी फ्लेक्सबाजांकडून करावी आर्थिक दंड वसुली’ या मथळ्याखाली दै. रयत समाचारचे प्रतिनिधी मंगेश आहेर यांची बातमी प्रसिध्द करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन काल ता.१६ रोजी महानगरपालिका प्रशासन प्रमुख यशवंत डांगे यांनी अतिक्रमणविरोधी पथकाला मनमाडरोडवरील शहराचे विद्रूपीकरण करणारे अनाधिकृत फ्लेक्सबोर्ड काढण्यात लावल्याचे समजते.

काल दुपारी ही मोहिम सुरू झाल्याचे अनेक वाचकांचे फोन आले. पत्रकार चौकापासून मनपाच्या विद्युत विभागाची उंच क्रेन महामार्गावरील विद्युत खांबांवरील विद्रुप करणारे फ्लेक्स काढत होती. आमच्या प्रतिनिधीने काम करणारांना माहिती विचारली असता. वरून आदेश आल्याचे सांगितले. हि मोहिम सावेडीनाक्यापर्यंत येवून थांबली. येथून पुढे नागापूर मनपा हद्दीपर्यंत पुर्ण करणे गरजेचे होते. संबंधित विभागाने ही मोहिम पूर्ण करावी.

अनाधिकृत फ्लेक्स काढण्यास मनपा प्रशासनास जो खर्च आला तो खर्च संबंधितांकडून वसूल केला पाहिजे, अशी भुमिका रयत समाचारने मांडली होती. याकडेही आयुक्त डांगे यांनी लक्ष देवून वसूली करावी.20240816 134606

शहरात बेकायदेशिर अनाधिकृत फ्लेक्स ज्या वार्डात दिसेल त्याची गुगल लोकेशनसह माहिती संबंधित वॉर्ड केअरटेकरने मार्केटविभाग आणि अतिक्रमण विभागास दिली पाहिजे. फ्लेक्सबाजाला मार्केट विभागाने दंडाची प्रक्रिय करत नोटीस काढून दंड वसूल करावा व अतिक्रमणविरोधी विभागाने तात्काळ निष्कासनाची करण्याची कारवाई करावी. जेंव्हा चमकोगिरी करणाऱ्या अनाधिकृत फ्लेक्सबाजांना मोठा आर्थिक दंड होईल, तेंव्हाच शहराचे विद्रूपीकरणसुध्दा थांबेल. याकडे आयुक्त डांगे यांनी गांभिर्याने पाहिले पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *