human rights: क्रांतीदिनी सामाजिक न्यायाची नवी दिशा; समाजकल्याण कार्यालयात ट्रान्सजेंडर हेल्प-डेस्कचे उद्घाटन संपन्न

68 / 100 SEO Score

पुणे | १३ ऑगस्ट | प्रतिनिधी

क्रांतीदिनाचे औचित्य साधून, human rights महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्सजेंडर हेल्प-डेस्कचे लोकार्पण विशाल लोंढे, सहायक आयुक्त समाजकल्याण आणि ट्रान्सजेंडर प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पुणे आणि सेंटर फॉर अड्व्होकसी अँड रिसर्च यांच्या पुढाकारातून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे या हेल्प-डेस्कची निर्मिती करण्यात आली. शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजना व आरोग्यविषयक योजना आणि त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ट्रान्सजेंडर नागरिकांना एकाच छताखाली सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा पुढाकार घेण्यात आला.PSX 20240813 222138

याप्रसंगी बोलताना सेंटर फॉर अड्व्होकसी अँड रिसर्चचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक आनंद बाखडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी एक बोर्ड असावे यासाठी सिफारसह अनेकांनी पुढाकार घेतला व त्यातून ट्रान्सजेंडर बोर्डाची निर्मिती झाली. याचा पुढचा टप्पा म्हणजे हे हेल्प-डेस्क आहे. याप्रसंगी बोलताना सहायक आयुक्त विशाल लोंढे म्हणाले की ट्रान्सजेंडर नागरिकांसोबतचा भेदभाव रोखणे यासाठी प्रत्येकाने आपल्या पातळीवर प्रयत्न करायला हवा आणि या हेल्पडेस्कची निर्मिती हे त्यासाठीचे महत्वाच पाऊल आम्ही आमच्या विभागाच्या वतीने उचलले आहे. जास्तीत जास्त ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळखपत्र मिळवून देण्यासाठी व त्या माध्यमातून त्यांना विविध शासकीय विभागांच्या योजना मिळवून देण्यासाठी हेल्प-डेस्कच्या माध्यमातून समन्वय साधला जाईल. हेल्पडेस्कमध्‍ये शुभांगी चौघुले यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. तसेच हेल्पडेस्कच्‍या माध्‍यमातून मदत व मार्गदर्शन मिळवण्‍यासाठी हेल्‍पलाईन नंबर ९१५६८८८३६० जारी करण्‍यात आला.

याप्रसंगी ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी कार्यरत असणाऱ्या अनेक संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या कादंबरी शेख म्हणाल्या की, ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी एक हेल्पडेस्क असावे अशी आमची अनेक दिवसांची मागणी होती, त्यासाठी अनेकदा समाजकल्याण विभागासोबत आम्ही संवाद साधला आणि आज विशाल लोंढे सरांच्या पुढाकारातून आणि सिफारच्या प्रयत्नातून हे हेल्पडेस्क सुरू झाले याबद्दल मी आभार मानते. पुणे जिल्ह्यातील ५००० हून अधिक तृतीयपंथी नागरिकांना या हेल्प-डेस्क ची मदत होईल.
सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट एजन्सीचे प्रितेश कांबळे म्हणाले की, ट्रान्सजेंडर समूहासाठी उपजीविकेच्या अनुषंगाने प्रयत्न सामाजिक संस्था करतात त्यासोबत अधिकार आधारित विविध कागदपत्रे व योजना मिळवण्यात या डेस्कचा मोठा वाटा असेल.

पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे उप अधिकारी राजेंद्र मोरे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेने ५ योजना ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी सुरू केलेल्या आहेत. तसेच या हेल्प-डेस्कसाठी जी काही मदत लागेल ती करण्यासाठी पुणे महानगरपालिका तयार आहे.
याप्रसंगी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती लोखंडे, पुणे मनपाचे समाजसेवक संदिप कांबळे, जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंटचे जॉर्ज स्वामी, ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या ऐश्वर्या पांडव, आशिका पुणेकर, मोनिका पुणेकर आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय अधिकारी कर्मचारी व सेंटर फॉर अड्व्होकसी अँड रिसर्चचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन समाजकल्याणचे तालुका समन्वयक राजेंद्र शेलार यांनी तर आभार हेल्पडेस्क प्रतिनिधी शुभांगी चौगुले यांनी व्यक्त केले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *