सुरांच्या माध्यमातून शब्दांना सौंदर्य देणारा गायक मोहंमद रफी – राजकुमार गुरनानी; आदमी मुसाफिर है’ अशा गीतांनी मोहंमद रफी यांना अभिवादन

अहमदनगर | आबिदखान दुलेखान

शब्द हे फार काही करु शकते. कवींनी लिहिलेल्या गीतांमुळे माणसाला आकाशात असल्याचे भासावून जाऊ शकते. तर त्याच शद्बांनी माणसाची निचांकी ही होते. अशाच या कवींनी लिहिलेल्या गीतांना जोपर्यंत सुरांची साथ मिळत नाही तो पर्यंत ते रसिकांना आवडत नाही. या कार्यात सुरांच्या माध्यमातून शब्दांना सौंदर्य देण्यात मोहंमद रफी यांचा हातखंडा होता, असे प्रतिपादन संगीतप्रेमी व स्वरछंद ग्रुपचे राजकुमार गुरनानी यांनी केले.

गाता रहे मेरा दिल ग्रुप व स्वरछंद ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने स्व.मोहंमद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘आदमी मुसाफिर है’चे रावसाहेब पटवर्धन सभागृहात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गुरनानी बोलत होते. प्रमुख पाहुणे सिद्धी फोर्स चे संचालक श्रीहरी टीपुगडे, सुफी गायक पवन नाईक, राजकुमार गुरनाणी, अमिन धाराणी, दिपा माळी आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मोहंमद रफी यांना अभिवादन करण्यात आले.

मनोगत व्यक्त करताना श्रीहरी तीपुगडे म्हणाले की, आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोर गीतकारांच्या जयंती व पुण्यतिथीच्या माध्यमातून होणार्‍या या गायनाच्या कार्यक्रमातून नवीन कलाकारांना संधी प्राप्त होत आहे. अशाच कार्यक्रमांद्वारे छोटे कलाकार टी.व्ही. व सिनेमात सुद्धा पोहचत असून, कलाकारांना रोजगार प्राप्त होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात… बेखुदी में सनम उठ गये जो कदम.. कोयल बोली दुनिया डोली.. कितना प्यारा वादा.. वादा करले साजना.. तुम्हारी नजर क्यु खफा हो गई… आदमी मुसाफिर है.. आज कल तेरे मेरे चर्चे.. आजा तुझको पुकारे मेरा प्यार.. रिमझिम के गीत सावन गाये.. अश्या सुरेल व एव्हर ग्रीन गाणी सुनील भंडारी, प्रा.दिपा भालेराव, निता गडाख, हेमंत नरसाळे, सुनील हळगावकर ,पुनम कदम, प्रशांत दरे, वंदना जंगम, ॲड. अमिन धारानी, गुलशन धारानी, राजकुमार सहदेव, माधुरी सोनटक्के, चारू ससाने, महेश घावटे,रोणित सुखधन, डॉ.गायत्री कुलकर्णी, डॉ.दमण काशीद, जयश्री साळवे, चंदर ललवाणी, सुनीता धर्माधिकारी, आबीद खान आदींनी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट काळातील व कलर सिनेमाच्या काळातील मोहम्मद रफी यांचे सदाबहार अशा द्वीगीत सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांची वाहऽ वाही व भरपूर दाद मिळविली.

सूत्रसंचालन दिपा माळी यांनी मोहम्मद रफी यांच्या जीवनाचा प्रत्येक पहलु थोडाथोडा परिचय करून देत उत्तमरित्या केले. आभार ॲड. गुलशन धाराणी यांनी मानले. कार्यक्रमास मोहंमद रफी यांचे गीतप्रेमी व संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *