Yashwant Vidyalaya: यशवंत विद्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात - Rayat Samachar

Yashwant Vidyalaya: यशवंत विद्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध कवायत ठरली आकर्षण

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

पाथर्डी | १५ ऑगस्ट | पंकज गुंदेचा 

Yashwant Vidyalaya: अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शिराळ (ता. पाथर्डी) येथील यशवंत विद्यालयात देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास ग्रामस्थ, पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासाहेब काळे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकताच विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांसह शिस्तीचे दर्शन घडविले. विद्यालयाचे शिक्षक शेख सर आणि दगडखैर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व दिमाखदार सामूहिक कवायत सादर केली. विद्यार्थ्यांची ही कवायत कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका घुणे मॅडम यांनी प्रभावी व ओघवत्या शैलीत केले.
स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक नानासाहेब काळे, ज्योतिक सर, भापकर सर, झिने सर, दुशिंग मॅडम, ठाकर मॅडम आणि मुळे मामा यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ, प्रतिष्ठित मान्यवर, पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे यशवंत विद्यालयातील स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading