पणजी | १.८ | रयत समाचार
(IFFI 2026 Entries) भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) ५७ व्या आवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागातील प्रवेशिका (Call for Entries) स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. २० ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गोव्यात होणाऱ्या या प्रतिष्ठित महोत्सवात जगभरातील दर्जेदार चित्रपटांना मंच उपलब्ध होणार आहे.
(IFFI 2026 Entries) ‘Stories Without Borders’ या घोषवाक्याखाली आयोजित होणारा यंदाचा महोत्सव नव्या दिग्दर्शकांना, वैश्विक कथा आणि विविध सांस्कृतिक दृष्टिकोन असलेल्या चित्रपटांना प्राधान्य देणार आहे.
(IFFI 2026 Entries) आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग, सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्म, तसेच ICFT–UNESCO गांधी पदक यांसाठी चित्रपटांची निवड केली जाणार आहे. याशिवाय From Festivals Worldwide, Mission Life, Emerging Filmmakers, Restored Classics, Documentaries, Animation आणि Experimental Films असे विविध विशेष विभागही महोत्सवात असतील.
चित्रपट सादर करण्यासाठी इंग्रजी उपशीर्षके, स्क्रीनर, पोस्टर, ट्रेलर, स्थिर छायाचित्रे (Stills), संक्षिप्त कथा (Synopsis), संपूर्ण श्रेयनामावली (Credits), आवश्यक कागदपत्रे आणि चित्रपटाचे सर्व हक्क निर्मात्याकडे असल्याची पूर्तता आवश्यक आहे.
चित्रपट सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ असून, प्रवेशिका FilmFreeway या माध्यमातून किंवा अधिकृत संकेतस्थळावरील प्रक्रियेद्वारे स्वीकारल्या जाणार आहेत.
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थांनी पात्रता निकष, नियमावली आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी IFFIच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
🎬 जगातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या IFFI 2026 साठी प्रवेशिका खुल्या झाल्या आहेत. अर्जाची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६. संपूर्ण माहिती वाचा. #IFFI2026 #InternationalCinema #Goa #FilmFestival #RayatSamachar
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


