पुणे | २९.७ | रयत समाचार
(Bhagat Singh Biography) अमर हुतात्मा क्रांतिकारक सरदार कॉम्रेड भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित, त्यांच्या पुतणी वीरेंद्र सिंधू यांनी लिहिलेले अधिकृत आणि संशोधनाधिष्ठित जीवनचरित्र ‘युगद्रष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज’ हे पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे.
(Bhagat Singh Biography) अनेक वर्षांच्या अभ्यास, संशोधन आणि भगतसिंहांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. भगतसिंहांच्या जीवनप्रवासासह त्यांच्या पूर्वजांचे कार्य, विचार आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान यांचे दस्तऐवजीकरण या पुस्तकात करण्यात आले आहे.
(Bhagat Singh Biography) ग्रंथात केवळ भगतसिंहांचे चरित्रच नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी युवा क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभारलेल्या संघर्षाचेही रोमहर्षक वर्णन करण्यात आले आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी, संशोधक, विद्यार्थी आणि क्रांतिकारक विचारांचे अभ्यासक यांच्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरू शकतो.
हे पुस्तक पेपरबॅक स्वरूपात, ४०६ पानांचे असून उत्कृष्ट दर्जाच्या कागदावर छापण्यात आले आहे. पुस्तकाची घरपोहोच किंमत ₹४९९ असून कॅश ऑन डिलिव्हरी सुविधाही उपलब्ध आहे.
पुस्तक मागविण्यासाठी इच्छुकांनी Book Now बटणाद्वारे ऑर्डर फॉर्म भरावा किंवा बुकविश्व, पुणे येथे ९३२२०६७४१८ या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधावा. ऑनलाइन खरेदीसाठी बुकविश्वच्या संकेतस्थळावरही पुस्तक उपलब्ध आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


