Nasha Mukta Bharat Competition | 'नशामुक्त भारत' अभियानाला युवकांची साथ; जिल्हास्तरीय स्पर्धांद्वारे राज्य-राष्ट्रीय स्तर गाठण्याची 1 संधी - Rayat Samacharअहिल्यानगरमध्ये 'Nasha Mukta Bharat Competition' जिल्हास्तरीय स्पर्धा; युवकांना राज्य-राष्ट्रीय स्तर गाठण्याची संधी

Nasha Mukta Bharat Competition | ‘नशामुक्त भारत’ अभियानाला युवकांची साथ; जिल्हास्तरीय स्पर्धांद्वारे राज्य-राष्ट्रीय स्तर गाठण्याची 1 संधी

मेरा युवा भारत व सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेचा संयुक्त उपक्रम; २९ जुलै रोजी विविध कला साहित्य स्पर्धा

rayatsamachar
2 Min Read
MY Bharat आणि सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेतर्फे २९ जुलै रोजी 'नशा मुक्त भारत' विषयावरील जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजनSubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | २५.७ | रयत समाचार

(Nasha Mukta Bharat Competition) भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत (MY Bharat) अहिल्यानगर आणि बीपीएचई सोसायटीच्या सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था (CSRD-ISWR) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा शक्ती- नशा मुक्त भारताची शक्ती’ या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती घडवून आणणे, सर्जनशीलतेला चालना देणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

(Nasha Mukta Bharat Competition) या स्पर्धा ता.२९ जुलै २०२६ रोजी सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, अहिल्यानगर येथे होणार आहेत. जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक- युवतींना वैयक्तिक किंवा गट स्वरूपात सहभागी होता येणार आहे. स्पर्धांमध्ये लोकगीत (संगीत), नृत्य, नुक्कड नाटक/माईम, चित्रकला, वादविवाद, लघुपट/रील, घोषवाक्य लेखन तसेच कविता/स्लॅम पोएट्री अशा विविध कला व साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

सर्व स्पर्धांचा विषय ‘नशा मुक्त भारत’ हा असून, व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश कलाकृतीतून मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(Nasha Mukta Bharat Competition) स्पर्धेतील उत्कृष्ट विजेत्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी MY Bharat पोर्टलवर नोंदणी करून संबंधित विभागाची निवड करत मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज सादर करावा, असे आवाहन सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे आणि मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजित संतोष यांनी केले.

अहिल्यानगरमध्ये MY Bharat व CSRD आयोजित Nasha Mukta Bharat Competition जिल्हास्तरीय स्पर्धांची माहिती

या उपक्रमामुळे युवकांना त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळण्याबरोबरच समाजात व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचविण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. अधिक माहितीसाठी ९२२५७७६९९५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading