मुंबई | २१.७ | रयत समाचार
(Gyan Bharatam Campaign) भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि डिजिटल स्वरूपात संरक्षण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे ‘ज्ञानभारतम्’ (Gyan Bharatam) राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान देशभर राबविण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. या राष्ट्रीय उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या अमूल्य ज्ञानसंपदेचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
(Gyan Bharatam Campaign) सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, या अभियानांतर्गत देशभरातील प्राचीन हस्तलिखितांचा शोध, नोंदणी, दस्तऐवजीकरण तसेच डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. अध्यात्म, धर्म, तत्त्वज्ञान, आयुर्वेद, गणित, ज्योतिष, नाट्यशास्त्र, रसायनशास्त्र यांसह विविध विषयांवरील कागद, ताडपत्र, भूर्जपत्र, कापड किंवा इतर माध्यमांवरील हस्तलिखितांचा या सर्वेक्षणात समावेश केला जाणार आहे.
(Gyan Bharatam Campaign) विशेष म्हणजे, या प्रक्रियेमुळे हस्तलिखितांची मालकी संबंधित व्यक्ती, संस्था किंवा संग्रहकर्त्यांकडेच कायम राहणार असून शासनाकडून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने जतन व डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.
हे ही पहा : History | युद्ध संपले, माणुसकी जिवंत राहिली : १३ जुलै १६००, सुलताना चांदबीबी स्मृतिदिन
त्यामुळे घरात, मठ, मंदिरे, आश्रम, ग्रंथालये, संशोधन संस्था किंवा खाजगी संग्रहामध्ये जपून ठेवलेली प्राचीन हस्तलिखिते असल्यास त्यांची माहिती ‘Gyan Bharatam’ मोबाईल ॲपवर नोंदवून या राष्ट्रीय अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. अधिक माहितीसाठी : gyanbharatam.com ला भेट द्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आवाहन व्हिडीओ येथे पहा
आपल्या ज्ञानवारशाचे जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. या राष्ट्रीय अभियानात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले.
Tukaram Abhang | संतवाणी : ‘संतां नाहीं मान’ तुकोबांच्या अभंगाचा खरा अर्थ !
📜 भारताच्या हजारो वर्षांच्या ज्ञानपरंपरेचे जतन करण्यासाठी ‘ज्ञानभारतम्’ राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू. आपल्या घरातील किंवा संस्थेतील प्राचीन हस्तलिखितांची नोंदणी करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आवाहन. #GyanBharatam #SunetraPawar #Heritage #RayatSamachar
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


