Raj Thackeray Letter | सत्तेचा माज आला आहे का? राज ठाकरेंचे फडणवीसांना खुले पत्र, भाजपच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका - Rayat SamacharRaj Thackeray Letter राज ठाकरेंचे फडणवीसांना खुले पत्र; भाजपच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका

Raj Thackeray Letter | सत्तेचा माज आला आहे का? राज ठाकरेंचे फडणवीसांना खुले पत्र, भाजपच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका

...अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील; ठाकरेंचा इशारा

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून राज ठाकरे यांनी खुले पत्र प्रसिद्ध करत विविध मुद्द्यांवर टीका केलीSubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ४.७ | रयत समाचार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून खुले पत्र (Raj Thackeray Letter) प्रसिद्ध करत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर तसेच राज्यातील काही घडामोडींवर कठोर शब्दांत टीका केली आहे. ‘भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, अशी चर्चा देशभर होत आहे. हा संसर्ग आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे का? असा सवाल त्यांनी पत्रातून उपस्थित केला.

Raj Thackeray letter to Devendra Fadnavis

- Advertisement -

राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा उल्लेख करत, राज्यातील राजकारण हे देशातील इतर राज्यांपेक्षा सुसंस्कृत आणि विचारप्रधान राहिले असल्याचे नमूद केले. मात्र, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राची तुलना मागास राजकीय संस्कृती असलेल्या राज्यांशी होऊ लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. Raj Thackeray Letter

पत्रात त्यांनी एका आमदार आणि पदाधिकाऱ्याच्या कथित असंवेदनशील वर्तनाचा उल्लेख करत, अशा प्रकारांवर सरकारकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

“Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely” या प्रसिद्ध उक्तीचा संदर्भ देत सत्तेतील काही नेत्यांच्या वर्तनावर त्यांनी टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही Raj Thackeray Letter स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ‘देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, अशी अपेक्षा होती. मात्र अशा घटनांवर तुमच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्याने तुमच्या संवेदनशीलतेबद्दल प्रश्न निर्माण होतात, असे त्यांनी म्हटले.

 हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद

गेल्या ३७ वर्षांच्या राजकीय अनुभवाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, पूर्वी कोणत्याही पक्षातील नेत्यांकडून चूक झाल्यास त्यावर पक्षभेद न करता कारवाई होत असे. मात्र आता ‘आपला माणूस’ म्हणून चुकीचे वर्तनही खपवून घेतले जात असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी पत्राच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांना चुकीचे वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. ‘अशा बेफाम वागणाऱ्यांचे राजीनामे घ्यायला हवेत. फडणवीस चुकीचे वागणाऱ्यांवर कठोर शासन करतात, हे एकदा दाखवून द्या. मग सगळेच सुतासारखे सरळ येतील, असे त्यांनी नमूद केले.

“तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या पत्राचा समारोप

Crime | रस्ता ‘चोरी’ला गेला ? नागरिकांना माहिती असावी मनपाच्या ‘ताब्यातील रस्त्यांची नोंदवही’

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading