नगर तालुका | २.७ | रयत समाचार
‘पृथ्वीवर झाडे आहेत म्हणून आपण आहोत’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठान, सह्याद्री देवराई, वसुंधरा फाऊंडेशन आणि फेन्सकोट इंजिनीअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अक्षरमानव झाड संमेलन’ या अनोख्या Tree Conference उपक्रमाचे आयोजन ता. २४ व २५ जुलै २०२६ रोजी मनगाव (देहरे), जिल्हा अहमदनगर येथे करण्यात आले.
हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा
पर्यावरण संवर्धन आणि माणुसकीचा संदेश एकाच मंचावर आणणाऱ्या Tree Conference संमेलनात झाडांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी मुक्त प्रवेश ठेवण्यात आला आहे. झाडांचे ऋण व्यक्त करत प्रत्यक्ष वृक्षारोपणातून पृथ्वीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Tree Conference संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे ठिकाण. डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे यांनी उभारलेल्या माऊली सेवा प्रतिष्ठानमध्ये लैंगिक अत्याचारातून मनोरुग्ण झालेल्या महिला आणि त्यांच्या मुलांचा मायेने सांभाळ केला जातो. माणुसकीचा आदर्श ठरलेल्या या संस्थेच्या विस्तीर्ण परिसरात सामूहिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे.
हे ही वाचा : Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक
असा असेल दोन दिवसांचा कार्यक्रम : २४ जुलै रोजी संध्याकाळपर्यंत सहभागी मनगाव येथे दाखल होतील. त्यानंतर झाडांवरील लघुपट, कविता, गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रमुख पाहुण्यांशी मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अभिनेते आणि वृक्षदूत सयाजी शिंदे यांची उपस्थिती. पर्यावरण संवर्धनाबाबत त्यांच्या अनुभवातून सहभागी प्रेरणा घेणार आहेत. २५ जुलै रोजी सकाळी एक हजार झाडांचे सामूहिक वृक्षारोपण करण्यात येणार असून सर्व सहभागी त्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवतील. सायंकाळी संमेलनाचा समारोप होईल.
संमेलनासाठी येणाऱ्या सर्व सहभागींची राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली. कोणतेही प्रवेश शुल्क नसले तरी सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर व्हॉट्सॲप समुहाद्वारे स्थळ, प्रवास आणि इतर माहिती दिली जाईल.
झाडे लावण्याबरोबरच कविता, गाणी, लघुपट किंवा अन्य कार्यक्रम सादर करू इच्छिणाऱ्यांनी संजीवनी राजगुरू 8850180935 यांना संपर्क साधावा. रोपांची देणगी देऊ इच्छिणाऱ्यांनी संजय सपकाळ 9922320063 यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



