Shrigonda Excise Office | राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू; टिळक भोस यांच्या वर्षभराच्या पाठपुराव्याला यश - Rayat Samacharश्रीगोंद्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र Shrigonda Excise Office कार्यालय सुरू; टिळक भोस यांच्या पाठपुराव्याला यश

Shrigonda Excise Office | राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू; टिळक भोस यांच्या वर्षभराच्या पाठपुराव्याला यश

कर्जत, जामखेड व पारनेर तालुक्यांनाही होणार लाभ

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
श्रीगोंद्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू; अवैध दारूविरोधी कारवाईला मिळणार वेगSubEditor | Dipak Shirasath

श्रीगोंदा | ३०.६ | माधव बनसुडे

तालुक्यातील वाढत्या अवैध दारू विक्री, हातभट्टी आणि इतर बेकायदेशीर मद्यधंद्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र कार्यालय Shrigonda Excise Office श्रीगोंदा येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयासाठी गेल्या वर्षभर सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि सतीश बोरुडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.

हे ही वाचा : Public issue | तासन्‌तास वीज गेली? ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो; महावितरणचे नियम काय सांगतात? 

तालुक्यात वाढलेल्या अवैध दारू विक्री व हातभट्टीच्या व्यवसायाविरोधात टिळक भोस आणि सतीश बोरुडे यांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने सादर केली होती. संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. यापूर्वी अहिल्यानगर येथे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर १६ जून रोजी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्रीगोंद्यात स्वतंत्र Shrigonda Excise Office कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी Shrigonda Excise Office उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अहिल्यानगर येथे असल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. आता श्रीगोंद्यातच कार्यालय सुरू झाल्यामुळे अवैध दारू विक्री, हातभट्टी आणि इतर बेकायदेशीर प्रकारांवर त्वरित व प्रभावी कारवाई करणे शक्य होणार आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यासह कर्जत, जामखेड आणि पारनेर तालुक्यातील कारभार अधिक सक्षमपणे हाताळला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद

- Advertisement -
गेल्या काही महिन्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणावर धडक कारवाया करून अनेक गुन्हे दाखल केले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळात स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने अवैध दारू विक्री, गावठी दारू व हातभट्टीचे धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी आणखी कठोर मोहीम राबविण्याची मागणी टिळक भोस यांनी केली.
सरकारी इमारतीसाठीही पाठपुरावा सुरू राहणार : टिळक भोस म्हणाले, राज्य उत्पादन शुल्क विभाग हा महाराष्ट्र शासनाला दरवर्षी २९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवून देणारा महत्त्वाचा विभाग आहे. राज्यभर २४ नवीन कार्यालये तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी अनेक कार्यालये सुरू झाली नव्हती. गेल्या वर्षभर सातत्याने पाठपुरावा, आंदोलने आणि उपोषणाच्या इशाऱ्यानंतर श्रीगोंद्यात हे कार्यालय सुरू झाले आहे. सध्या हे कार्यालय भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आले असून भविष्यात या विभागाची स्वतंत्र शासकीय इमारत उभी राहावी, यासाठीही आमचा पाठपुरावा सुरू राहील. तसेच तालुक्यातील अवैध दारू, गावठी दारू आणि हातभट्टीचे धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न कायम राहतील.

Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading