NHM Contract Employees | राष्ट्रीय आरोग्य अभियान 15,010 कंत्राटींना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवा, अधिसंख्य पदनिर्मितीस मंजुरी - Rayat SamacharNHM Contract Employees राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा; अधिसंख्य पदांना शासनाची मंजुरी

NHM Contract Employees | राष्ट्रीय आरोग्य अभियान 15,010 कंत्राटींना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवा, अधिसंख्य पदनिर्मितीस मंजुरी

३० जूनच्या शासन निर्णयामुळे नियमित समायोजनाचा मार्ग मोकळा

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
३० जून २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेला राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भातील शासन निर्णयSubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ३०.६ | रयत समाचार

(NHM Contract Employees) राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. ३० जून २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य (Supernumerary) पदे निर्माण करण्यास आणि त्यावर नियुक्ती देण्यासाठी आवश्यक खर्चास मंजुरी देण्यात आलीय.

(NHM Contract Employees) या निर्णयामुळे दीर्घकाळ कंत्राटी स्वरूपात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेला स्थैर्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, मंत्रिमंडळाने २५ जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

(NHM Contract Employees) निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यात येणार. संबंधित कर्मचाऱ्यांना समकक्ष नियमित पदांच्या वेतनश्रेणीनुसार अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात येणार. पदांची वेतनश्रेणी निश्चित करताना सातव्या वेतन आयोगाचा आधार घेतला जाणार. कर्मचाऱ्यांचे सध्याचे वेतन संरक्षित राहणार. मूलभूत वेतनासोबत महागाई भत्ता व प्रवास भत्ता लागू राहील.

या अधिसंख्य पदांवर पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, सेवा निवृत्ती किंवा कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू राहणार नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मिळणाऱ्या रजा व इतर सवलती कायम राहतील.

ही पदे व्यक्तीसापेक्ष असतील. कर्मचारी सेवानिवृत्त, राजीनामा, मृत्यू किंवा इतर कारणाने सेवा सोडल्यानंतर ती पदे आपोआप समाप्त होतील. या पदांवर नवीन भरती किंवा वारस नियुक्ती करण्यात येणार नाही. अधिसंख्य पदांवरील सेवेसाठी कमाल वयोमर्यादा ५८ वर्षे निश्चित करण्यात आली.
या निर्णयामुळे राज्य शासनावर वार्षिक अंदाजे ₹१,१५३.६० कोटींचा आर्थिक भार पडणार असून त्यालाही शासनाने मंजुरी दिली. अनेक वर्षांच्या मागणीला न्याय. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हजारो कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावत आहेत. नियमित सेवेत समायोजनासाठी त्यांची सातत्याने मागणी होती. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर आता शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज

📢 NHM कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासनाने १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदनिर्मितीस मंजुरी दिली. ३० जूनच्या शासन निर्णयातील सर्व महत्त्वाच्या तरतुदी वाचा फक्त रयत समाचार वर.

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading