अहमदनगर | २० जून | रयत समाचार
(संत निरंकारी मिशन आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026) ‘निरोगी शरीर, निर्मळ मन आणि सजग आत्मा’ या पवित्र संकल्पाची पूर्तता करण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी (दि. २१ जून) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशव्यापी योग व आध्यात्मिक चेतना अभियान राबविण्यात येणार आहे. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन आशीर्वाद व प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमात भारतभरातील १,५०० हून अधिक केंद्रांवर एकाच वेळी सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
(संत निरंकारी मिशन आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026) मिशनच्या विविध शाखांमध्ये स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सत्संग भवन, सार्वजनिक मैदाने आणि उद्यानांमध्ये योग सत्रे आयोजित केली जाणार असून, श्रद्धाळू, सेवादल स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत.
(संत निरंकारी मिशन आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026) अहमदनगर शाखेच्या वतीनेही रविवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत मिस्किन रोड येथील संत निरंकारी सत्संग भवनाच्या प्रांगणात सामूहिक योगासने व प्राणायामाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगप्रकारांचे प्रात्यक्षिक होणार असून सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी सांगितले की, २०१५ पासून फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रव्यापी योग अभियान सातत्याने राबविले जात आहे. योग ही भारताची प्राचीन आणि गौरवशाली परंपरा असून, तो केवळ शरीर सुदृढ ठेवत नाही तर मनाला स्थैर्य, विचारांना सकारात्मकता आणि आत्म्याला आध्यात्मिक चेतना प्रदान करतो. नियमित योगाभ्यासामुळे तणाव व बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. त्याचबरोबर मानसिक आनंद, आत्मिक समाधान आणि सामाजिक सद्भाव वृद्धिंगत होतो.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक योग उपक्रमात मोठ्या संख्येने योगप्रेमी, नागरिक आणि युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.
#InternationalYogaDay #SantNirankariMission #Ahmednagar #Yoga2026 #RayatSamachar
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



