अहमदनगर | १७.६ | रयत समाचार
(Rip news) गं.भा. सुभद्रा शरदचंद्र फलके यांचे रविवारी, ता. १४ जून २०२६ रोजी दीर्घ आजाराने अहिल्यानगर येथील यशवंत कॉलनीतील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नालेगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
(Rip news) कै. आमदार पांडुरंग यशवंत फलके गुरुजी यांच्या त्या सुनबाई होत्या. ‘सुभद्रा वहिनी’ या नावाने त्या सर्वत्र परिचित होत्या. धार्मिक वृत्ती, साधी राहणी आणि अत्यंत मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी समाजात आपुलकीचे स्थान निर्माण केले होते.
(Rip news) त्या नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिला फलके-जोशी, अर्चना फलके तसेच बांधकाम व्यवसायिक मयूर फलके यांच्या मातु:श्री होत. त्यांचे मूळ गाव फलकेवाडी असून, त्यांच्या निधनामुळे फलकेवाडी परिसरासह अहिल्यानगर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अंत्यविधीप्रसंगी ॲड. विश्वासराव आठरे पाटील, आमदार नरेंद्र घुले पाटील, ॲड. वसंतराव कापरे, ॲड. सुभाष भोर यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विधी आणि बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी दिवंगत सुभद्रा फलके यांना आदरांजली अर्पण करून फलके कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



