ज्ञानवार्ता | १४ जून | रयत समाचार
(Education) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा झपाट्याने वाढणारा प्रभाव आता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात दिसून येत आहे. मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉप, व्यवसाय, नोकरी आणि विविध क्षेत्रांमध्ये AI चा वापर वाढत असल्याने हे तंत्रज्ञान नेमके काय आहे आणि त्याचा प्रभावी वापर कसा करता येईल, हे समजून घेणे आजच्या काळाची गरज बनली.
(Education) याच उद्देशाने प्रसाद शिरगावकर यांनी ‘AI कट्टा’ हा उपक्रम सुरू केला आहे. AI शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी हा सर्वसामान्यांचा हक्काचा कट्टा असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(Education) AI संदर्भातील विविध प्रश्नांची उत्तरे, नव्या संकल्पनांची माहिती आणि प्रत्यक्ष वापराचे मार्गदर्शन या कट्ट्यावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. काही प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधून देण्याबरोबरच अनेक विषयांवर सहभागींसोबत सामूहिक चर्चेद्वारे उत्तरे शोधण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
गावातील वडाच्या पारावर संध्याकाळी गावकरी जसे एकत्र बसून अनुभवांची देवाणघेवाण करतात आणि एकमेकांकडून शिकतात, त्याच धर्तीवर AI कट्ट्याची संकल्पना उभी करण्यात आली आहे. AI विषयाचा अधिक अभ्यास, प्रयोग आणि अनुभव असल्यामुळे आपण या कट्ट्यावर मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणार असल्याचे शिरगावकर यांनी नमूद केले आहे.
AI कट्ट्याचे दोन विभाग असतील. ‘कट्टा ए आम’ आणि ‘कट्टा ए खास’. ‘कट्टा ए आम’मध्ये AI संदर्भातील ज्ञान, माहिती आणि मार्गदर्शन मोफत उपलब्ध असेल. तर ‘कट्टा ए खास’मध्ये विशेष अभ्यासक्रम आणि प्रगत स्वरूपाचे प्रशिक्षण अत्यंत माफक शुल्कात उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे अभ्यासक्रम दैनंदिन जीवन, व्यवसाय आणि नोकरीमध्ये जलद प्रगती साधण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा करण्यात आला.
उपक्रमाच्या प्रारंभानिमित्त सर्वांसाठी एक मोफत AI टूलकिट उपलब्ध करून देण्यात आले आहे. AI शिकण्याची सुरुवात करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे टूलकिट उपयुक्त ठरेल, असे आवाहन करण्यात आले.
AI म्हणजे नेमके काय, त्याचा वापर कसा करायचा आणि भविष्यातील संधी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी AI कट्ट्याच्या संकेतस्थळाला भेट देऊन हे टूलकिट डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले.
AI चे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, प्रत्येकाने ते आत्मसात करावे आणि आपल्या जीवनात त्याचा प्रभावी उपयोग करावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वांच्या सहभागातून हा कट्टा अधिक समृद्ध आणि गजबजलेला व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
AI कट्टा संकेतस्थळ : https://aikatta.in/
टूलकिट डाउनलोड करण्यासाठी : संकेतस्थळावरील ‘Free AI Toolkit’ लिंकवर क्लिक करून ‘AI Chatbot म्हणजे नक्की काय?’ ही PDF मोफत डाउनलोड करता येणार आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



