Ad imageAd image

Agriculture | रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा; शेतकरी प्रश्नांवर एकजूट

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पंढरपूर | १४.६ | रयत समाचार

(Agriculture) शेतकरी कर्जमाफीमधील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी गेले दोन दिवस अन्नत्याग आंदोलनाला बसलेले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला. अशी माहिती संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिली.

(Agriculture) याबाबत अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले, शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर रोहितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये खतांच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमती, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी तसेच कांदा निर्यातीबाबत सरकारच्या चुकीच्या धोरणांचा समावेश होता.

(Agriculture) शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करणाऱ्या प्रत्येक चळवळीच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ठामपणे उभी राहील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. राज्यातील शेतकरी आर्थिक संकटातून जात असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यापक लढा उभारण्याची गरज असल्याचे मतही देशमुख यांनी व्यक्त केले.
दरम्यान, कर्जमाफीतील अटी शिथिल करून अधिकाधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी रोहित पवार यांनी सुरू केलेल्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले असून विविध संघटना व शेतकरी प्रतिनिधींकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे.

FDA | ‘गुटखा तस्करां’ना मोक्का लावणार – तुकाराम मुंढे; पत्रकार परिषद व्हिडीओ पहा


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading