(Religion) पद्मरुप गोरखनाथ
धर्मवार्ता | ११.६ | सुधाकर गायधनी
चेतनेच्या काळ्या विवरात
साधका घडे प्रवास दिनरात
अल्याड-पल्याड तो अंधारात
चेतवे तो आत्मरुप वात |
तै घडे प्रकाशाशी सुसंवाद
अंधाराचे मिटती वादविवाद
कोटी किरणांशी ह्रदयसंवाद
जाणत्या कळे हा ब्रम्हनाद |
सूक्ष्म चित्ताग्राची एकाग्रता
योगयोगिनी ती आत्मीयता
अंतरात वाहे निरंतर सरिता
हे पद्मरुप गोरखनाथा |
हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



