अहमदनगर |१०.६ | रयत समाचार
(Women) जागतिक योग दिनानिमित्त येथील योग विद्या धामच्या वतीने महिलांसाठी भव्य योगासन स्पर्धा शनिवारी ता.२० जून रोजी आयोजित केली आहे, अशी माहिती योग विद्याधामचे अध्यक्ष डॉ. सुंदर गोरे यांनी दिली.
(Women) या स्पर्धा सकाळी ६ ते १० या वेळेत कोहिनूर मॉल येथे होणार आहे. ही स्पर्धा २० ते ३५ वर्ष पहिला गट व ३५ वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांसाठी दुसरा गट अशा दोन गटात होणार आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या महिलांना प्रथम, द्वितीय व तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सन्मानपूर्वक आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे.
(Women) महिलांच्या सुप्त गुणांना व चांगल्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना दोन आसने करावी लागणार आहेत. पहिले आसन त्यांनी स्वतःच्या पसंतीने करावयाचे आहे. तर दुसरे आसन परीक्षक ऐनवेळी करावयास सांगणार आहेत.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी 9423962940 किंवा 9326940136 या नंबरवर संपर्क साधावा. तसेच या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन योग विद्या धामच्या प्रकल्प प्रमुख पूजा गांधी यांनी केले.
Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



