Ad imageAd image

World news | कम्युनिस्ट संपले म्हणणाऱ्यांना उत्तर; मेलोनींच्या इटलीत कम्युनिस्ट उमेदवाराचा दणदणीत विजय

६७.४७ टक्के मतांनी कॉम्रेड मॅन्युएल मिनर्व्हिनी मेयरपदी विराजमान

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ९ जून | रयत समाचार

(World news) जगभरात डाव्या विचारसरणीचा प्रभाव कमी होत असल्याची चर्चा सुरू असतानाच इटलीतून आलेल्या एका निवडणूक निकालाने या चर्चेला छेद दिला. इटलीतील पुगलिया प्रांतातील मोलेफेट्टा शहराच्या महापौरपदी (मेयर) कम्युनिस्ट रिफाऊन्डेशन पक्षाचे उमेदवार कॉम्रेड मॅन्युएल मिनर्व्हिनी यांची तब्बल ६७.४७ टक्के मतांनी दणदणीत निवड झाली.

(World news) अधिक माहिती देताना भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मुंबईचे नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी सांगितले, ३६ वर्षीय मॅन्युएल मिनर्व्हिनी हे व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांनी दुसऱ्या फेरीतील निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे.

(World news) कॉम्रेड रेड्डी यांच्या मते, इटलीमध्ये सध्या उजव्या आणि अतिउजव्या विचारसरणीच्या राजकारणाचा प्रभाव वाढलेला असतानाही मोलेफेट्टा शहरातील मतदारांनी डाव्या विचारसरणीवरील विश्वास कायम असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे हा विजय केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नसून उजव्या राजकारणाला दिलेले एक राजकीय उत्तर मानले जात आहे.
या विजयाबद्दल कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी इटलीतील कम्युनिस्ट कार्यकर्ते आणि समर्थकांचे अभिनंदन करताना, सामाजिक न्याय, कामगार हक्क आणि लोकशाही मूल्यांसाठी लढणाऱ्या शक्तींना या निकालातून नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
‘कम्युनिस्ट संपले’ असा दावा करणाऱ्यांसाठी मोलेफेट्टा येथील निकाल हा एक ठोस राजकीय संदेश मानला जात असून, इटलीतील या विजयाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुरू झाली.

India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading