मुंबई | १.६ | रयत समाचार
(Politics) मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या एका वारसाला अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी पात्र वारसांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत.
(Politics) सामान्य प्रशासन विभागाने ता. १ जून २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या धर्तीवर एमआयडीसी संचालक मंडळाच्या ४९० व्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय मंजूर करण्यात आला.
(Politics) या निर्णयानुसार, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील पात्र वारसांची जिल्हास्तरावर पडताळणी करण्यात येणार आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य आणि पात्र वारसांची निश्चिती करून प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. त्यानंतर संबंधित वारसांना एमआयडीसीमध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकरणांमध्ये अर्ज, कागदपत्रे व पात्रतेची तातडीने छाननी करून अधिकृत प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे मराठा आरक्षण आंदोलनात जीव गमावलेल्या कुटुंबांना आर्थिक आधार आणि रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
या निर्णयामुळे आंदोलनग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळणार असून, शासनाच्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
सोशल मीडियावर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे असल्याचा दावा करण्यात आलेले एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रानुसार मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका वारसाला MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा उल्लेख आहे. मात्र या पत्राबाबत शासन किंवा MIDC कडून अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
