Politics | भाजपचे विधानपरिषद उमेदवार जाहीर; ईडीमुक्त प्राजक्त तनपुरेंची लागली लॉटरी

राज्यभरातील १० जागांसाठी भाजपची यादी जाहीर

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ३१.५ | रयत समाचार

(Politics) भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक २०२६ तसेच पोटनिवडणुकीसाठी स्थानिक प्राधिकरण मतदारसंघांमधील उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने मंजुरी दिलेल्या या यादीत राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण १० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
(Politics) अहिल्यानगर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून भाजपने प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून विधान परिषद निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
(Politics) भाजपने जाहीर केलेल्या यादीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून अरुण लखानी, भंडारा-गोंदियामधून अविनाश ब्रह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे पाटील, सांगली-सातारामधून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव-लातूर-बीडमधून बसवराज पाटील आणि जळगावमधून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी नागपूर मतदारसंघातून डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या घोषणेनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात निवडणुकीचे वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading