जामखेड | ३१.५ | रयत समाचार
(Business) ‘नवराष्ट्र’ हे मराठी वृत्तपत्र समाजातील ज्वलंत प्रश्न, महत्त्वाच्या घडामोडी आणि सर्वसामान्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडणारे माध्यम म्हणून ओळखले जाते. निष्पक्ष, विश्वासार्ह आणि दर्जेदार पत्रकारितेमुळे या दैनिकाने वाचकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे, असे गौरवोद्गार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केले.
(Business) आपल्या निवासस्थानी ‘नवराष्ट्र’चे वाचन करताना त्यांनी दैनिकाच्या आकर्षक मांडणी, अचूक वृत्तांकन आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेचे विशेष कौतुक केले. समाजहित जपत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ‘नवराष्ट्र’ सातत्याने करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
(Business) राम शिंदे यांनी सांगितले की, बदलत्या काळात माध्यमांची भूमिका अधिक जबाबदारीची झाली असून, लोकांच्या अपेक्षांना न्याय देणारी पत्रकारिता आजची गरज आहे. ‘नवराष्ट्र’ने आपल्या वृत्तांकनातून ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत जनमानसात विश्वास निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.
दर्जेदार पत्रकारिता, सामाजिक भान आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेमुळे ‘नवराष्ट्र’ने वाचकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
