Sports | कटारिया ठरला चॅम्पियन तर रशियन ग्रँडमास्टर पेट्र किरियाकोव उपविजेता - Rayat Samachar

Sports | कटारिया ठरला चॅम्पियन तर रशियन ग्रँडमास्टर पेट्र किरियाकोव उपविजेता

मोतीलालजी फिरोदिया बुद्धिबळ स्पर्धेचा उत्साहात समारोप

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर |३१.५ | रयत समाचार

(Sports) येथे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा रविवारी उत्साहात समारोप झाला. २७ मे ते ३१ मे दरम्यान पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील तसेच परदेशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

- Advertisement -

(Sports) अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर राजस्थानचा अरुण कटारिया याने स्पर्धेचे विजेतेपद पटकावत मानाचा किताब आपल्या नावे केला, तर रशियन ग्रँडमास्टर पेट्र किरियाकोव याने उपविजेतेपद मिळविले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया तसेच रशियन ग्रँडमास्टर पेट्र किरियाकोव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी आणि रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्यांना एकूण पाच लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली.

(Sports) या स्पर्धेमुळे अहिल्यानगर शहरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू एकत्र आले असून, बुद्धिबळ क्षेत्रातील नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी खेळाडू, पालक, आयोजक आणि बुद्धिबळप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विजेत्या स्पर्धकांचा सत्कार आणि गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading