जामखेड | १९.५ | रयत समाचार
(Crime) येथील तुषार बोथरा या व्यक्तीने सोशल मीडियावरील फेसबुक प्लॅटफॉर्मवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव व पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक टिप्पणी केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड पोलिस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
(Crime) ता. १९ मे रोजी झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले. संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला होता.
(Crime) या प्रकरणातील सोशल मीडियावरील टिप्पणीमुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व वारशाचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली होती.
शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित आरोपी तुषार बोथरा याला अटक केली.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), संभाजी ब्रिगेड, मुस्लिम पंच कमिटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंच, विविध ओबीसी संघटना आदींनी जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनात नगरसेविका संगिताताई भालेराव, नगरसेवक प्रशांत राळेभात, नगरसेवक वसीम सय्यद, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहरभाई काझी, संभाजी ब्रिगेडचे अवधूत पवार, ॲड. हर्षल डोके, सुरेखाताई सदाफुले, गणेश जाधव, पत्रकार रिजवान बागवान, बापू ओव्हळ यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

