(Rip news) ‘तुम तो ठहरे परदेसी’चे लोकप्रिय गीतकार शायर ज़हीर आलम यांचे निधन; संगीत विश्वात हळहळ

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नागपूर | ११.५ | रयत समाचार

(Rip news) हिंदी संगीतविश्वात आपल्या शब्दांच्या जादूने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध शायर आणि गीतकार ज़हीर आलम यांचे दीर्घ आजाराने रविवारी रात्री नागपूर येथे निधन झाले. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साहित्य, गझल आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

(Rip news) “तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे…” या सुपरहिट गीतामुळे ज़हीर आलम घराघरात पोहोचले होते. विरह, प्रेम आणि आयुष्याच्या भावनांना साध्या पण हृदयस्पर्शी शब्दांत मांडण्याची त्यांची शैली रसिकांच्या मनात कायम घर करून राहिली. ९० च्या दशकात त्यांच्या लेखणीतून उतरलेली अनेक गीते आणि शायरी आजही संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत.

(Rip news) ज़हीर आलम यांनी आपल्या कारकिर्दीत गझल, कव्वाली आणि हिंदी गीतांच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या शब्दांमध्ये माणसांच्या भावना, वेदना आणि वास्तव यांचे प्रभावी चित्रण दिसून येत असे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मुशायरे आणि साहित्यिक व्यासपीठांवर त्यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.
त्यांच्या निधनाची वार्ता समोर येताच साहित्यिक, संगीतकार, गायक तसेच चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. नागपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.
ज़हीर आलम यांच्या जाण्याने हिंदी शायरी आणि गीतलेखन क्षेत्रातील एक संवेदनशील आवाज कायमचा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading