Rip news | ‘आकाशवाणी’च्या सुषमा अमर यांचे निधन; सकाळी 11 वाजता प्रार्थना सभा 

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ७.५ | रयत समाचार

(Rip news ) ज्येष्ठ सामाजिक व प्रगतिशील विचारांच्या कुटुंबातील श्रीमती सुषमा प्रकाशजितसिंह अमर यांचे ता. ६ मे २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने अमर व जाधव कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून सामाजिक व परिचित वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

(Rip news) त्या ‘आकाशवाणी’च्या निवृत्त कर्मचारी होत्या. प्रकाशजितसिंह अमरिकसिंह अमर यांच्या पत्नी होत्या. तसेच स्व. अमरिकसिंह अमर व स्व. मनजीत अमरिकसिंह अमर यांच्या सून, नताशा कुलदीप सिंग यांच्या प्रेमळ मातोश्री आणि ज्येष्ठ डाव्या विचारांचे कार्यकर्ते कॉ. भास्करराव जाधव व श्रीमती कमल जाधव यांच्या कन्या तसेच निलीमा बंडेलू यांच्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात पती, कन्या तसेच विस्तृत परिवार असा मोठा परिवार आहे.

(Rip news) त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभेचे आयोजन बुधवारी ता. ७ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, ४० नंबर बंगला, मिलिटरी क्वार्टर्स, पॉटिंजर रोड, अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार व शुभचिंतकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन कुटुंबीयांनी केले.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading