पुणे | ३.५ | रयत समाचार
(Literature) राजहंस प्रकाशन निर्मित आणि डॉ. अभिजित वैद्य लिखित ‘विवेकयात्री’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा येत्या शुक्रवारी ता. ८ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृह, नवी पेठ, गांजवे चौक येथे पार पडणार आहे.
(Literature) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. गणेश देवी, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ज्ञ, भूषवणार आहेत. तसेच, प्रा. राजा दीक्षित (माजी अध्यक्ष, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
(Literature) ‘विवेकयात्री’ हा ग्रंथ मानवी संस्कृतीतील विवेक अविवेकाच्या संघर्षाचा, तत्त्वज्ञानाच्या प्रवासाचा आणि विचारांच्या उत्क्रांतीचा वेध घेणारा आहे. मानवी जीवनातील प्रश्न, संघर्ष, दिशा आणि आत्मशोध यांचा सखोल अभ्यास या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे वाचकांना चिंतनशील आणि प्रबोधनात्मक अनुभव देणारा हा ग्रंथ ठरणार असल्याचे मानले जाते.
या प्रकाशन सोहळ्यास सर्व साहित्यप्रेमी, अभ्यासक, विचारवंत आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे सस्नेह निमंत्रण आयोजकांनी दिले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
