मुंबई | २७.४ | रयत समाचार
(Cultural Politics) जगप्रसिद्ध ‘शिवाजी कोण होता?‘ या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे जाहीर वाचन गोरेगाव पश्चिम येथील आरे रोड परिसरात उत्साहात पार पडले. याबाबतची माहिती युवराज मोहिते यांनी दिली.
(Cultural Politics) या उपक्रमात नीरजा, संतोष कोल्हे, अक्षय शिंपी, मुकुंद कुळे आणि युवराज मोहिते यांनी पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे प्रभावी वाचन केले. या वाचनासाठी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. रस्त्यावरून ये-जा करणारे अनेकजण थांबून हे वाचन ऐकत होते, त्यामुळे परिसरात वेगळेच बौद्धिक वातावरण निर्माण झाले.
(Cultural Politics) यावेळी आयोजकांनी सांगितले, सामाजिक सलोखा आणि ऐतिहासिक विचारांची योग्य मांडणी यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. “संजय गायकवाड यांच्या गुंडगिरीला आमचे एकच उत्तर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचं जाहीर वाचन, असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमामुळे विचारप्रवर्तक साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक वेगळा आणि प्रभावी प्रयत्न पाहायला मिळाला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.




